Revelation 8:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
चौथ्या देवदूताने त्याचा कर्णा वाजविला. तेव्हा सूर्याच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. चंद्राच्या एक तृतीयांश भागावर व ताऱ्यांच्या एक तृतीयांश भागावर आघात झाला. त्यामुळे त्याचा एक तृतीयांश भाग काळा झाला. दिवसाचा एक तृतीयांश काळा भाग झाला. रात्रीचा एक तृतीयांश भाग काळा झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यानंतर चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व ताऱ्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यामुळे त्यांच्या प्रकाशाचे एक तृतीयांश तेज कमी झाले आणि एक तृतीयांश दिवसाचा तसेच एक तृतीयांश रात्रीचाही प्रकाश नाहीसा झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा सूर्याचा एक तृतीयांश, चंद्राचा एक तृतीयांश व तार्यांचा एक तृतीयांश ह्यांवर प्रहार झाला. त्यांचा तृतीयांश अंधकारमय व्हावा आणि दिवसाच्या तसे रात्रीच्याही तृतीयांशात प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चौथ्या देवदूताने आपला कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा तिसरा हिस्सा, चंद्र व तारे यांचाही तिसरा हिस्सा काळा झाला. त्यामुळे दिवसाचा एकतृतीयांश भाग प्रकाशाविना आणि रात्रीचा एकतृतीयांश भाग अंधार झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही.