Revelation 9:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
टोळांचा एक राजा होता. हा राजा अथांग दऱ्याचा दूत होता. यहूदी भाषेत त्याचे नाव अबद्दोन, आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपुल्लोन (विध्वंसमूलक) होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
अथांग विवराचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. हिब्रू भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि ग्रीक भाषेतले त्याचे नाव अप्रूओन आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अथांग डोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे; इब्री भाषेतील त्यांचे नाव अबद्दोन, आणि हेल्लेणी भाषेतील त्याचे नाव अपल्लूओन आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अथांग कूपाचा सत्ताधारी देवदूत त्यांचा राजा होता. त्याचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन, हेल्लेणी भाषेत अपल्लूओन (जो सर्वनाशक) असे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे.