Romans 1:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा त्याची त्यांना शिक्षा मिळावी म्हणून देवाने नाईलाजाने त्यांना त्यांच्यावर सोडून दिले. त्यांना लाजिरवाण्या वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्या स्त्रियांनी स्त्रियांशी अनैसर्गिक संबंध ठेवले.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ह्या कारणामुळे देवाने त्यांना लज्जास्पद दुर्वासनांच्या स्वाधीन केले. त्यांच्यातल्या स्त्रियांनीसुद्धा शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कारणांमुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; त्यांच्यातल्या स्त्रियांनी शरीराचा नैसर्गिक उपभोग सोडून विपरीत आचरण केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या कारणासाठी, परमेश्वराने त्यांना निर्लज्ज वासनांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्यांच्या स्त्रियांनी देखील नैसर्गिक लैंगिक संबंधापेक्षा अनैसर्गिक संबंध ठेवले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले;