Romans 1:28 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि जेव्हापासून त्यांनी देवाला ओळखण्याचे नाकारले, तेव्हापासून देवाने त्यांना अशुद्ध मनाच्या हवाली केले व ज्या अयोग्य गोष्टी त्यांनी करु नयेत त्या करण्यास मोकळीक दिली.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण ज्याअर्थी देवाचे खरे ज्ञान लक्षात ठेवावयास ते नकार देतात, त्याअर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास भ्रष्ट मनाच्या स्वाधीन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी ज्या अर्थी देवाची जाणीव ठेवण्यास ते मान्य झाले नाहीत, त्या अर्थी देवाने त्यांना अनुचित कर्मे करण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतरही, परमेश्वराचे ज्ञान राखून ठेवावे हे त्यांना उचित वाटले नाही, म्हणून परमेश्वरानेही त्यांची मने दुष्टतेच्या स्वाधीन केली, यासाठी की जे करू नये ते त्यांनी करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.