Romans 10:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याला हाक मारणे त्यांना कसे शक्य होईल? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर विश्वास ठेवणे त्यांना कसे शक्य होईल? आणि जर कोणी त्यांना उपदेश केला नाही, तर ते कसे ऐकतील?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मात्र ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणार्यांवाचून ते कसे ऐकतील?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा ते कसा धावा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील? आणि घोषणा करणार्याशिवाय ते कसे ऐकतील?