Romans 10:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु मी म्हणातो, “इस्राएल लोकांना कळले नव्हते काय?” होय, त्यांना कळले, प्रथम मोशे म्हणतो, “खरे तर ज्या लोकांचे राष्ट्र नाही त्यांचा उपयोग करुन मी तुम्हांला मत्सरी करीन. विश्वासहीन राष्ट्राचा उपयोग करुन मी तुम्हांला राग आणीन.”अनुवाद 32:21
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पुन्हा मी विचारतो की, इस्राएलला कळले नव्हते काय? मोशे प्रथम उत्तर देतो: मी तथाकथित राष्ट्रायोगे तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्रायोगे मी तुम्हांला चीड आणीन.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणखी मी विचारतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नव्हे त्याच्या योगे मी तुम्हांला ईर्ष्येस पेटवीन, एका मूढ राष्ट्राच्या योगे मी तुम्हांला चीड आणीन.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी पुन्हा विचारतो: हे इस्राएली लोकांना कळलेच नाही का? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नाही त्यांच्याद्वारे मी तुम्हाला ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी तुम्हाला क्रोधास आणेन.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण मी म्हणतो की, इस्राएलाला कळले नव्हते काय? प्रथम मोशे म्हणतो, ‘जे राष्ट्र नाहीत त्यांच्याकडून. मी तुम्हास ईर्ष्येस चढवीन, एका निर्बुद्ध राष्ट्राकडून मी तुम्हास चेतवीन.’