Romans 10:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नंतर यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे मला शोधीत नव्हते त्यांना मी सापडलो, जे माझी चौकशी करीत नसत त्यांना मी प्रगट झालो.” यशया 65:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यशया तर धिटाईने म्हणतो: ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो, जे माझ्याविषयी विचारत नव्हते त्यांना मी प्रकट झालो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि यशया फार धीट होऊन म्हणतो, “जे माझा शोध करत नसत त्यांना मी पावलो; जे विचारत नसत त्यांना मी प्रकट झालो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाह धिटाईने म्हणाला, “ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे; ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’