Romans 10:8 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नाही! शास्त्र काय म्हणते? “ते वचन तुमच्याजवळ, तुमच्या मुखात, तुमच्या अंत:करणात आहे.” ते वचन हे आहे
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर ते नीतिमत्व काय म्हणते? ‘देवाचा शद्ब तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे,’ आमच्या विश्वासाचा विषय असलेला तो शद्ब आम्ही जगजाहीर करीत आहोत, तो हाच,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर ते काय म्हणते? “ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे”; (आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत) ते हेच आहे
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याचा अर्थ काय आहे? “हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,” हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ते काय म्हणते? ते वचन तुझ्याजवळ, ते तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. म्हणजे आम्ही ज्याची घोषणा करतो ते विश्वासाचे वचन हे आहे.