Romans 11:13 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर तुम्ही जे यहूदी नाही त्यांना मी निश्चितपणे सांगतो कारण मी यहूदीतरांसाठी प्रेषित आहे. मी माझ्या सेवेला मान देतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यहुदीतरांकरता प्रेषित ह्या नात्याने मी सांगतो की, मी माझ्या सेवाकार्याचा अभिमान बाळगतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आता तुम्हा परराष्ट्रीयांना मी हे सांगतो. ज्या अर्थी मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्या अर्थी मी आपल्या सेवेला मोठेपणा देतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो.