Romans 11:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर प्रथम भाग पवित्र आहे, तर संपूर्ण पिठाचा गोळा पवित्र आहे. जर झाडाचे मूळ पवित्र आहे तर फांद्यासुद्धा पवित्र आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
पिठाच्या गोळ्याचा पहिला भाग देवाला अर्पण केल्यास पवित्र होतो तेंव्हा संपूर्ण गोळा पवित्र होतो आणि जर मूळ पवित्र तर फांद्याही पवित्र.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कणकेची पहिली मूठ पवित्र ठरल्यास गोळाही तसाच ठरेल, आणि मूळ जर पवित्र तर फांद्याही पवित्र ठरतील.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत.