Romans 11:24 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून तुम्ही जे निसर्गत; रानटी जैतुनांची फांदी म्हणून तोडले गेलात आणि निसर्गक्रम सोडून मशागत केलेल्या जैतुनाच्या झाडास कलम असे लावले गेलात तर किती सहजपणे मशागत केलेल्या जैतुनांच्या फांद्या त्या मूळच्या झाडात कलम केल्या जातील!
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जे मूळचे जंगली ऑलिव्ह झाड त्यांतून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून अस्सल ऑलिव्ह वृक्षात करण्यात आले. तर ह्या ज्या मूळच्या त्याच्याच फांद्या आहेत, त्यांचे कलम त्या अस्सल ऑलिव्ह वृक्षात किती सहजतेने करण्यात येईल?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे मूळचे रानटी जैतुनाचे झाड त्यातून तुला कापून तुझे कलम सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतुनात लावले, तर ह्या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्यांचे कलम आपल्या जैतुनात किती विशेषेकरून लावण्यात येईल?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या सर्वानंतर, जर तुम्हाला मूळच्या रानटी जैतुनाच्या झाडातून कापून टाकले, त्या तुम्हाला सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतूनात कलम लावले, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतूनात किती विशेषकरून कलम म्हणून लावल्या जातील!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?