Romans 12:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हांला विनवितो की, तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
बंधुजनहो, मी देवाच्या महान करुणेमुळे तुम्हांला आवाहन करतो की, तुम्ही आपली शरीरे सजीव, पवित्र व ग्रहणीय यज्ञ म्हणून देवाला समर्पित करावीत, ही खरी उपासना आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.