Romans 13:12 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रात्र जवळ जवळ संपत आली आहे आणि ‘दिवस’ जवळ आला आहे. म्हणून आपण अंधाराची कामे बाजूला टाकूया आणि प्रकाशाची शस्त्रसामुग्री धारण करु.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
रात्र सरत चालली आहे, दिवस जवळ येत आहे, म्हणून आपण अंधकाराची कृत्ये टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे; म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रात्र सरत आली असून दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधारातली कामे टाकून प्रकाशातली शस्त्रसामग्री परिधान करू या.