Romans 13:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होय, तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे, परंतु वाईट करशील तर त्याची भीति बाळग, कारण तो तलवार व्यर्थ बाळगीत नाही. त्याचे वाईट करणाऱ्याचा सूड घेणारा तो देवाचा सेवक आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग, कारण तो अधिकार व्यर्थ धारण करत नाही तर क्रोध दाखविण्याकरिता वाईट करणाऱ्यांना शिक्षा करणारा असा तो देवाचा सेवक आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. पण जर तू वाईट करशील तर त्याची भीती बाळग; कारण तो तलवार व्यर्थ धारण करत नाही; तर क्रोध दाखवण्याकरता वाईट करणार्याचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तलवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.