Romans 13:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तू ज्यांचा ऋणी आहेस त्यांचे देणे देऊन टाक. ज्यांना कर द्यावयाचा त्यांना कर दे. ज्यांना जकात द्यावयाची त्यांना जकात दे. ज्यांचा धाक धरायचा त्यांचा धाक धर. ज्याला मान द्यायचा त्याला मान दे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याचा आदर राखायचा त्याचा आदर राखा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या; ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या; ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या; ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून सर्वांना त्यांचे देणे द्या; ज्याला कर त्यास कर, ज्याला जकात त्यास जकात, ज्याला आदर त्यास आदर, ज्याला मान त्यास मान.