Romans 13:9 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“व्यभिचार करु नको, खून करु नको, चोरी करु नको, वाईटाचा लोभ धरु नको” या आज्ञांमुळे मी असे म्हणतो आणि आणखी एखादी आज्ञा असेल तर ती आज्ञा “जशी आपणांवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर” या शब्दात सामावलेली आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, लोभ धरू नकोस ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ह्या वचनात सामावलेला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण “व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटी साक्ष देऊ नकोस, लोभ धरू नकोस,” ह्या आज्ञांचा आणि दुसरी कोणतीही आज्ञा असली तर तिचाही सारांश, “जशी आपणावर तशी आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” ह्या वचनात आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,” आणि इतर दुसर्या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा,” या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे.