Romans 14:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जो विशेष दिवस पाळतो तो प्रभूचा मान राखण्यासाठी पाळतो आणि जो कोणत्याही प्रकारचे अन्र खातो तो प्रभूचा मान राखण्यासाठी खातो. विशिष्ट प्रकारचे अन्र खात नाही तो प्रभूचा मान ठेवण्यासाठी खात नाही. तो सुद्धा देवाचे आभार मानतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो; जो खातो तो प्रभूकरता खातो कारण तो देवाचे आभार मानतो आणि जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही आणि तोही देवाचे आभार मानतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो दिवस पाळतो, तो प्रभूकरता पाळतो, [आणि जो पाळीत नाही तो प्रभूकरता पाळत नाही;] आणि जो खातो तो प्रभूकरता खातो, कारण तो देवाचे आभार मानतो; जो खात नाही, तो प्रभूकरता खात नाही, आणि तोही देवाचे आभार मानतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी एखादा दिवस विशेष पाळतो तो प्रभूसाठी पाळतो, आणि जो मांस खातो तो प्रभूसाठी खातो; कारण तो परमेश्वराचे आभार मानतो; जो वर्ज्य करतो तो प्रभूकरिता करतो आणि तोही परमेश्वराचे आभार मानतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.