Romans 14:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणून जर आपण जगतो किंवा मरतो तर आपण प्रभूचे आहोत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
जर आपण जगतो, तर प्रभूकरता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो, म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जर आपण जगतो तर प्रभूकरता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण जगतो ते प्रभूकरिता जगतो; आणि आपण मरतो ते प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो, तरी प्रभूचे आहोत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत.