Romans 15:24 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेव्हा मी स्पेनला जाईल तेव्हा तुम्हांला भेटण्याचा विचार करीत आहे व तुमच्याविषयी माझे मन भरल्यावर माझ्या त्या प्रवासात तुम्ही मला मदत कराल अशी आशा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन. तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने मन काहीसे तृप्त झाल्यावर तुम्ही मला तिथे जायला साहाय्य कराल, अशी मी आशा धरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून मी स्पेन देशाला जाईन तेव्हा तुमच्याकडे येईन (कारण तिकडे जाताना मी तुम्हांला भेटेन आणि तुमच्या सहवासाने काहीसे मन भरल्यावर तुम्ही माझी तिकडे बोळवण कराल अशी मी आशा धरतो.)
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण स्पेन देशाची सफर करण्याचा माझा मानस आहे. तिकडे जाताना आशा आहे की मी काही काळ तुमच्या सहवासात आनंदाने घालविल्यावर, तुम्ही मला पुन्हा वाटेस लावावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी स्पेन देशाकडे प्रवास करीन तेव्हा तुमच्याकडे येईन; कारण मी अशी आशा करतो की, मी तिकडे जाताना तुम्हास भेटेन आणि तुमच्यात आधी, थोडा तृप्त झाल्यावर तुम्ही तिकडे पोहचते करावे.