Romans 15:3 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्ताने सुद्धा स्वत:ला सुखी केले नाही. याउलट पवित्र शास्त्रात लिहिले आहे. “तुझी निंदा करणान्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही, तर ‘तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली’, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाकडे पाहिले नाही; तर “तुझी निंदा करणार्‍यांनी केलेली निंदा माझ्यावर आली,” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे ते झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ख्रिस्तानेसुद्धा स्वतःला संतुष्ट केले नाही, परंतु असे लिहिले आहे: “तुझा अपमान करणार्‍याने केलेला अपमान माझ्यावर आला आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्‍यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले.