Romans 16:17 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बंधूजनहो, मी तुम्हांस विंनति करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे कलह आणि असंतोष निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवा व त्यांच्यापासून दूर राहा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला शिक्षण मिळाले आहे, त्याविरुद्ध जे फूट पाडतात व अडथळे आणतात त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता बंधूंनो व भगिनींनो, मी तुम्हाला आग्रहाने विनंती करतो की, जे शिक्षण तुम्हाला मिळाले आहे त्याविरुद्ध जे फूटी व अडथळे आणणारे आहेत, त्यांच्यावर लक्ष ठेवा; आणि त्यांच्यापासून दूर राहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.