Romans 16:2 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
की, संतांना योग्या अशा प्रकारे तुम्ही तिचा स्वीकार करावा. आणि तिला तुमच्याकडून जी मदत लागेल ती करावी कारण माझ्यासह ती पुष्कळांना मदत करणारी होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल, त्या त्या कामात तिला साहाय्य करावे कारण ती स्वतः पुष्कळ जणांना व मलाही साहाय्य करत आली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अशासाठी की, तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे; कारण ती स्वत: पुष्कळ जणांस व मलाही साहाय्य करणारी अशी झाली आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी तुम्हाला सांगतो की प्रभूच्या लोकांना शोभेल असे तिला प्रभूमध्ये स्वीकारा आणि जी काही मदत तिला तुमच्यापासून पाहिजे ती द्या, कारण तिने अनेक लोकांचे व माझेही साहाय्य केले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुम्ही पवित्र जनांस शोभेल असे तिचे प्रभूमध्ये स्वागत करा आणि तिच्या ज्या कामात तुमची गरज लागेल त्यामध्ये तिचे साहाय्यक व्हा; कारण ती स्वतः पुष्कळांना व मलाही साहाय्यक झाली आहे.