Romans 2:1 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून हे मनुष्या, तू जो कोणी आहेस व जेव्हा तू न्यायासनासमोर बसतोस तेव्हा तुला सबब नाही, कारण जेव्हा तू दुसऱ्यांचा न्याय करतोस तेव्हा तू स्वत:लाही दोषी ठरवितोस कारण जो तू न्याय करतोस, तो तूही तीच गोष्ट करतोस.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा हे मानवा, दोष लावणारा तू कोणीही असलास तरी स्वतः तुला सबब नाही; कारण ज्यात तू दुसर्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही दुसर्यांना दोष लावता, एखाद्या विषयाला धरून दुसर्यांचा न्याय करता, त्यावेळी तुम्ही स्वतः दोषी ठरता; कारण तुम्ही जे न्याय करणारे आहात, ते स्वतःच त्या गोष्टी करता. यामुळे, तुम्हाला कोणतीच सबब सांगता येणार नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा दुसर्याला दोष लावणार्या अरे बंधू, तू कोणीही असलास तरी तुला सबब नाही; कारण तू ज्या गोष्टींत दुसर्याला दोष लावतोस त्यामध्ये तू स्वतःला दोषी ठरवतोस; कारण दोष लावणारा तूही त्याच गोष्टी करतोस.