Romans 2:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणजे ते त्याच्या ह्दयात नियमशास्त्र लिहिले आहे, असे दाखवतात त्यांची सद्सद्विवेक बुद्धीसुध्दा साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां विषयीचे विचार त्यांना आरोपी किंवा दोषमुक्त करतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणजे नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे, असे ते दाखवतात, शिवाय त्यांची सदसद्विवेकबुद्धीही साक्ष देते कारण त्यांचे मन त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवतात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकां-विषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते प्रदर्शित करतात की नियम त्यांच्या अंतःकरणात लिहिलेले आहे; त्यांची विवेकबुद्धीच त्यांना साक्ष देते आणि त्यांचेच विचार त्यांना दोषी किंवा निर्दोष ठरवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि एकमेकांतील त्यांचे विचार जेव्हा एकमेकांवर आरोप करतात किंवा एकमेकांचे समर्थन करतात आणि त्यांचे विवेकही त्यांच्या जोडीला साक्ष देतात तेव्हा ते त्यांच्या हृदयावर लिहिलेल्या नियमशास्त्राचा परिणाम दाखवितात.