Romans 2:26 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सुंता न झालेला मनुष्य जर नियमशास्त्राचे पालन करतो, तर त्याची सुंता न होणे हे सुंता झाल्याप्रमाणे समजण्यात येणार नाही काय?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर परमेश्वर त्या माणसाला सुंता झाल्यासारखा नाही का मानणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग सुंता न झालेल्या माणसाने नियमशास्त्रातील नियम पाळले तर त्याचे सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर ज्यांची सुंता झाली नाही ते नियमशास्त्राचे पालन करतात, तर त्यांची सुंता न होणे, हे सुंता झाल्यासारखे होणार नाही काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून कोणी मनुष्य जर सुंता न झालेला असूनही, नियमशास्त्राचे नियम पाळील तर त्याची सुंता न होणे हे सुंता असे गणण्यात येणार नाही काय?