Romans 2:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा विपुल दयाळूपणा, धीर आणि सहनशीलता यांचा अवमान करून परमेश्वराची दया तुला पश्चात्तापाकडे नेणारी आहे हे तुला समजत नाही का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?