Romans 2:5 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण तुम्ही लोक कठीण व उद्धट मनाचे आहात, तुम्ही बदलण्यास तयार नाही, त्यामुळे तुम्ही स्वत:च तुमची शिक्षा अधिकाधिक वाढवित आहात. जेव्हा देव (तुम्हाला) त्याचा क्रोध दर्शवील, त्यावेळी तुम्हांला शिक्षा होईल. त्या दिवशी लोक देवाचा यथायोग्य न्याय पाहतील.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
की, आपल्या हटवादीपणाने पश्चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या हट्टीपणामुळे आणि पश्चात्ताप विरोधी अंतःकरणामुळे, तुम्ही आपल्यासाठी परमेश्वराच्या क्रोधाचा दिवस व नीतीचा न्याय प्रकट होईल तोपर्यंत क्रोध साठवून ठेवीत आहात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस.