Romans 3:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता आपणाला माहीत आहे की, नियमशास्त्र जे सांगते ते नियमशास्त्राच्या आधिन असणाऱ्यांकरिता आहे व मनुष्यांच्या कामचुकार पणाला आळा घालण्यासाठी व सर्व जगाला चांगले व पूर्ण होण्यासाठी आहे. त्या नियमशास्त्र प्रमाणे सर्व दोषी आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपणाला ठाऊक आहे की, प्रत्येकाचे तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर जबाबदार धरण्यात यावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते धर्मशास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्याला ठाऊक आहे की, प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे, म्हणून नियमशास्त्र जे काही सांगते ते शास्त्राधीन असलेल्या लोकांना सांगते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपल्याला माहीत आहे की, जे काही नियमशास्त्र सांगते ते नियमाच्या अधीन असणार्‍यांना सांगते, यासाठी की प्रत्येक तोंड बंद होईल व सर्व जगाला परमेश्वरासमोर हिशोब द्यावा लागेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.