Romans 3:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.”स्तोत्र. 51:4
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कधीच नाही! प्रत्येक मनुष्य जरी खोटा ठरला तरीही देव खरा ठरेल! धर्मशास्त्रातही लिहिलेले आहे: तू आपल्या शद्बांत नीतिमान ठरावे आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कधीच नाही! देव खरा आणि प्रत्येक मनुष्य खोटा ठरो; शास्त्रातही लिहिलेले आहे की, “तू आपल्या वचनात नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता तुला जय मिळावा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नक्कीच नाही! प्रत्येक मनुष्य लबाड असला तरी परमेश्वर खरेच आहेत. यासंबंधी असे लिहिले आहे: “म्हणून तुम्ही यथायोग्य न्याय दिला आहे आणि जेव्हा तुम्ही न्याय देता तेव्हा ते दोषमुक्त असतात.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’