Romans 3:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु तुम्ही असे म्हणाला की, “जर देवाचा खरेपणा माझ्या खोटेपणामुळे त्याच्या गौरवासाठी उठून दिसत असेल, तर मग मी पापी का गणला जातो?”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु माझ्या असत्यावरून देवाची सत्यता त्याच्या गौरवासाठी समृद्ध होत असल्याचे दिसून आले, तर एखाद्या पापी माणसाप्रमाणे मला शिक्षेस पात्र का ठरविण्यात यावे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तसेच माझ्या लबाडीवरून देवाचे सत्य त्याच्या गौरवासाठी विपुल असल्याचे दिसून आले तरी एखाद्या पापी माणसाप्रमाणे मीही शिक्षेस पात्र का ठरावे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणी असा वाद करेल, “जर माझ्या खोटेपणाने परमेश्वराच्या खरेपणाचे संवर्धन होते व त्यांचे अधिक गौरव होते, तर मी पापी आहे असा दोष का लावण्यात येत आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा?