Romans 3:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर मग काय? आम्ही यहूदी, विदेशी लोकांपेक्षा अधिक चांगल्या स्थितीत आहोत काय? मुळीच नाही! कारण यहूदी आणि ग्रीक हे सारखेच पापाच्या अधिकाराखाली आहेत.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग काय? आम्ही यहुदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहुदी व यहुदीतर हे सर्व पापाच्या प्रभावाखाली आले आहेत, हे मी अगोदरच दाखवून दिले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग काय? आम्ही यहूदी श्रेष्ठ आहोत काय? मुळीच नाही; कारण यहूदी व हेल्लेणी हे सर्व पापवश आहेत असा आरोप आम्ही सर्वांवर अगोदरच ठेवला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर मग काय? यात आम्हाला काही फायदा आहे का? मुळीच नाही! कारण आम्ही आधी यहूदी आणि गैरयहूदी सर्वजण पापाच्या सत्तेखाली आहेत असा आरोप केला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे.