Romans 4:18 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्या अंत:करणात आशा धरुन सर्व मानवाच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध असा विश्वास धरला म्हणून, “तुझी संतती ताऱ्यांसारखी अगाणित होईल आणि तुझे असंख्य वंशज होतील,” असे जे म्हटले आहे त्याप्रमाणे तो ‘अनेक राष्टांचा पिता’ झाला.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
‘आकाशातील ताऱ्यांइतकी तुझी संतती होईल’, ह्या धर्मशास्त्रवचनाप्रमाणे त्याने पुष्कळ राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही विश्वास ठेवला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“तशी तुझी संतती होईल,” ह्या वचनाप्रमाणे त्याने ‘बहुत राष्ट्रांचा बाप’ व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आशा धरण्यास काही आधार नसताना, अब्राहामाने आशेने विश्वास ठेवला व तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला, आणि “तुझी संततीही होईल.” असे त्याला सांगण्यात आले होते त्याचप्रमाणे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘तसे तुझे संतान होईल’ या वचनाप्रमाणे त्याने अनेक राष्ट्रांचा पिता व्हावे अशी आशा नसता, त्याने आशेने विश्वास ठेवला.