Romans 4:9 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर मग हे नीतिमत्व ज्यांची सुंता झाली आहे आणि ज्यांची सुंता झाली नाही अशांनाही लागू होते काय? जे बेसुंती आहेत अशांनाही ते लागू पडते कारण आम्ही म्हणतो, “अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमान असा गणण्यात आला.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तर मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरिता घोषित करण्यात आलेला आहे किंवा सुंता न झालेल्यांकरिताही आहे? आम्ही असे म्हणतो, “विश्वास हा अब्राहामसाठी नीतिमत्व असा गणण्यात आला होता”.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर हे आशीर्वचन सुंता झालेल्यांना आहे किंवा सुंता न झालेल्यांनाही आहे? कारण ‘विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता,’ असे आपण म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हा आशीर्वाद केवळ सुंता झालेल्यांसाठी आहे की सुंता न झालेल्यांसाठी सुद्धा आहे? आपण म्हणतो की अब्राहामाचा विश्वास त्याला नीतिमत्व असे गणण्यात आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्त्व असा गणण्यात आला होता.