Romans 7:20 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि ज्याअर्थी, ज्या गोष्टी मला कराव्याशा वाटत नाहीत त्या मी करतो, तेव्हा खरे तर त्या गोष्टी मी करतो असे नाही तर माइयाठयी असणारे पाप त्या गोष्टी करते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आता जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कृत्य मी स्वतः करतो असे नव्हे, तर माझ्यामध्ये वसणारे पाप ते करते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो, तर ते कर्म मी करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी वसणारे पाप ते करते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता जे मला करावयास नको असते, तेच मी करतो, ते मी नाही तर जे पाप माझ्यामध्ये वसते ते करते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.