Romans 7:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या बंधूनो, अशाच प्रकारे नियमशास्त्राप्रमाणे तुम्हांलाही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे ठार मारण्यात आले यासाठी की तुम्ही दुसऱ्या पुरुषाचे, जो मेलेल्यातून उठविला गेला होता त्याचे व्हावे, यासाठी की देवाच्या सेवेसाठी आमचा वापर व्हावा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याप्रमाणे, बंधुजनहो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात, अशासाठी की, तुम्ही दुसऱ्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला, त्याचे व्हावे आणि देवाच्या सेवेत उपयुक्त ठरावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याप्रमाणे, माझ्या बंधूंनो, तुम्हीही ख्रिस्ताच्या शरीराच्या द्वारे नियमशास्त्रासंबंधाने मृत झालात; अशासाठी की, तुम्ही दुसर्याचे म्हणजे मेलेल्यांतून जो उठला त्याचे व्हावे आणि आपण देवाला फळ द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याप्रमाणे बंधू व भगिनींनो, तुम्ही सुद्धा ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मृत झाले आहात, म्हणून तुम्ही दुसर्याचे, जो मरणातून उठविला गेला त्याचे व्हावे यासाठी की तुम्ही परमेश्वरासाठी फळ द्यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे.