Romans 8:36 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
असे लिहिले आहे की, “दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत. आम्हांला कापायला नेत असलेल्या मेंढराप्रमाणे समजतात.” स्तोत्र. 44:22
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: तुझ्यामुळे आम्ही नेहमीच मरणाच्या धोक्यात असतो. कापावयाच्या मेंढरासारखे आम्हांला गणले जाते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “तुझ्यामुळे आमचा वध दिवसभर होत आहे; कापायच्या मेंढरासारखे आम्हांला गणले आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण असे लिहिले आहे: “तुमच्याकरिता आम्ही दिवसभर मृत्यूचा सामना करीत असतो, वधाची प्रतीक्षा करणार्‍या मेंढरांसारखे आम्हाला गणण्यात आले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’