Ruth 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते वाढून लग्नाचे होई पर्यंत तुम्हाला थांबावे लागेल. पतिप्राप्तीसाठी मी तुम्हाला एवढे थांबवून ठेवू शकत नाही. माझ्या मनाला त्यामुळे फार यातना होतील. आधीच मी खूप सोसले आहे.परमेश्वराने माझी खूप परीक्षा पाहिली आहे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तरी ते प्रौढ होतील तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय? त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवर्यांवाचून राहाल काय? छे, छे, माझ्या मुलींनो, तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे; परमेश्वराचा हात माझ्यावर पडला आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही वाट पाहत राहणार काय? नाही, माझ्या मुलींनो. तुमच्यापेक्षा मला हे फारच दुःख आहे, कारण याहवेहचा हात माझ्याविरुद्ध झाला आहे!”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तरी ते मोठे होईपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल का? तुम्ही आता लग्न न करता पतीशिवाय रहाल का आणि त्याची वाट पहाल का? माझ्या मुलींनो, तुम्हाला होणाऱ्या दुःखासाठी मी फार दुःखी होत आहे, कारण परमेश्वराचा हात माझ्याविरुद्ध फिरला आहे.”