Ruth 2:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेवायची वेळ झाली तेव्हा बवाज रूथला म्हणाला, “चल, थोडी भाकर आमच्या बरोबर खाऊन घे. या रसात बुडवून खा.” तेव्हा रूथ सर्व मजुरांबरोबर बसली. बवाजने तिला हुरडाही दिला. तिने पोटभर खाल्ले. अगदी ताटात उरेपर्यंत खाल्ले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा; ह्या कढीत आपली भाकर बुडव.” त्या कापणी करणार्‍यांच्या पंक्तीला ती बसली. त्यांनी तिला हुरडा दिला; तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये. थोडी भाकरी घे आणि द्राक्षाच्या सिरक्यामध्ये बुडवून खा.” जेव्हा ती कापणी करणाऱ्याबरोबर खाली बसली, तेव्हा त्याने तिला थोडे भाजलेले धान्य दिले. तिने तिला हवे तेवढे खाल्ले आणि थोडेसे राहिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
भोजन करतेवेळी बवाज तिला म्हणाला, “इकडे ये, भाकर खा. या कढीत आपली भाकर बुडव.” कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीला ती बसली व त्याने तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला.