Ruth 2:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा प्रकारे रूथ बवाजकडे तिथल्या बायकांबरोबर काम करत राहिली. सातूचा हंगाम संपेपर्यंत तिने धान्य गोळा केले. पुढे गव्हाच्या हंगामातही ती तेथे जात राहिली. अशा तऱ्हेने ती आपल्या सासूबरोबर म्हणजे नामी बरोबरच राहिली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या मोलकरणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून जव आणि गव्हाची कापणी संपेपर्यंत रूथ जव गोळा करीत बवाजच्या स्त्रियांच्या जवळच राहिली. ती तिच्या सासूसह राहिली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरीणींबरोबर सरवा वेचला; आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली.