Ruth 3:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला वचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू रात्रभर येथे राहा, आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तयार झाला तर बरेच; त्याला ते करू दे; पण तुझ्यासंबंधाने आप्तकर्तव्य करायला तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी ते करीन. सकाळपर्यंत निजून राहा.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आज रात्री येथेच राहा आणि सकाळी जर त्याला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सोडविणारा म्हणून त्याचे कर्तव्य करावयाचे असेल, तर चांगलेच आहे; त्याला तुम्हाला सोडवू द्या. परंतु जर त्याची तशी इच्छा नसेल, तर याहवेहची शपथ, मी ते करेन. सकाळ होईपर्यंत येथेच पडून राहा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ्यासंबंधाने नातलगाचे काम करण्यास तयार झाला तर बरेच आहे, त्यास ते करू दे. पण तुझ्यासंबंधाने तो नातलगाचे काम करण्यास तयार झाला नाही, तर परमेश्वराच्या जिविताची शपथ, ते मी करीन. सकाळपर्यंत झोपून राहा.”