Ruth 3:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कोठे निजतो हे पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजून जा; मग काय करायचे ते तोच तुला सांगेल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा विश्रांती घेतो तेव्हा तो कुठे झोपत आहे, हे पाहून ठेव. नंतर जा आणि त्याच्या पायांवरील पांघरूण काढ आणि तिथेच पडून राहा. काय करावयाचे तोच तुला सांगेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो कोठे झोपतो ते पाहून ठेव आणि तो झोपला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरूण काढून तेथे झोपून राहा. मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल.”