Ruth 4:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बवाज मग वेशीजवळ चावडीपाशी गेला. तो नातलग दिसेपर्यंत तिथे थांबला. त्याला पाहिल्यावर बवाजने त्याला प्रेमाने बोलावले. आणि जवळ बसायला सांगितले, तो माणूस आला आणि बवाजच्या जवळ बसला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दरम्यान बवाज नगराच्या वेशीकडे गेला आणि तो तिथे बसला असताना तो सोडवणूक करणारा, ज्याच्याबद्दल त्याने सांगितले होते, तो मनुष्य पुढे आला. तेव्हा बवाज त्याला म्हणाला, “माझ्या मित्रा, इकडे ये आणि इथे बस.” तेव्हा तो तिकडे गेला आणि बसला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या नातलगाबद्दल बोलला होता तोसुद्धा तेथे आला, तेव्हा हा त्यास म्हणाला, “मित्रा, येथे येऊन बस.” तेव्हा तो तेथे जाऊन बसला.