Song of Solomon 4:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहा! तू सुंदर आहेस! माझ्या सखे, तू सुरूप आहेस! तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात. तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किती सुंदर आहेस तू, माझ्या प्रिये! आहा, किती सुंदर आहेस! तुझ्या पडद्याआड तुझे नयन कबुतरे आहेत. तुझे केस त्या शेरडांच्या कळपाप्रमाणे आहेत ज्या गिलआदाच्या टेकड्यांवरून झळकतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(त्या स्त्रीचा प्रियकर तिच्याशी बोलत आहे) अहा! प्रिये, तू सुंदर आहेस! तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे डोळे कबुतर असे आहेत. तुझे केस गिलाद पर्वताच्या उतारावरुन जाणाऱ्या शेरड्याच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत.