Song of Solomon 6:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मी आक्रोडाच्या राईतून दरीतली फळे बघायला गेले. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत का, डाळींबाना कळ्या आल्या आहेत का, ते बघायला गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
खोर्‍यांतील हिरवीगार झाडेझुडपे पाहावी, द्राक्षलता फुटल्या आहेत की काय, डाळिंबीला फुले आली आहेत की काय, ते पाहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दर्‍याखोर्‍यात वाढत असलेली नवी झाडे, द्राक्षवेलींना आलेले अंकुर, आणि डाळिंबाला आलेली फुले पाहण्यासाठी मी खाली अक्रोडाच्या झाडांच्या मळ्यात गेलो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खोऱ्यातील हिरवीगार झाडेझुडपे बघायला, द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की काय, डाळिंबांना फुले आले आहेत की काय, ते बघायला मी आक्रोडाच्या मळ्यातून गेले.