Song of Solomon 6:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्याकडे बघू नकोस! तुझे डोळे मला उद्दीपित करतात. लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतरावरुन नाचत खाली जातात तसे तुझे केस लांब आणि मोकळे आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्यावरून आपले डोळे काढ; त्यांनी मला घाबरे केले आहे; तुझे केस गिलाद डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्यावरून तू आपली दृष्टी काढ; कारण तुझे नयन मला भारावून सोडतात. तुझे केस गिलआद डोंगरावर चकाकणार्‍या शेळ्यांच्या कळपाप्रमाणे आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू आपले डोळे माझ्यापासून फिरीव, त्यांनी मला घाबरे केले आहे. जो शेरडांचा कळप गिलाद पर्वताच्या बाजूवर बसला आहे त्यासारखे तुझे केस आहेत.