Song of Solomon 7:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा कंठ हस्तदंती मनोर्‍यासारखा आहे; तुझे नेत्र बाथ-रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडांसारखे आहेत; तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरुजासारखे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हस्तिदंती मनोर्‍यासारखी तुझी मान आहे. तुझे नयन बाथ-रब्बीमच्या वेशीकडे असलेल्या हेशबोनाच्या तळ्यासारखे आहे. तुझे नाक जणू काही लबानोन येथील, जे दिमिष्कच्या दिशेला असलेल्या बुरुजासारखे रेखीव आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ-रब्बीमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दिमिष्काकडे बघणाऱ्या लबानोनाच्या मनोऱ्यासारखे आहे.