Song of Solomon 8:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या आईचे दुध पिणाऱ्या माझ्या लहानग्या भावासारखा तू असावास असे मला वाटते. तू जर मला बाहेर दिसलास तर मी तुझे चुंबन घेईन आणि त्यात काही गैर आहे असे कुणीही म्हणणार नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू माझ्या बंधूसारखा, माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते! तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते. माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किती बरे झाले असते जर तू माझ्या भावासारखा असतास, माझ्या आईच्या दुधाने त्याचे पोषण झाले! जर मी तुला बाहेर भेटले तर, मी तुझे चुंबन घेतले असते, आणि कोणीही माझा तिरस्कार केला नसता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(तरुण स्त्री आपल्या प्रियकराबरोबर बोलते) माझ्या आईचे स्तनपान केलेल्या माझ्या बंधूसारखा तू असतास तर किती बरे होते. तू मला बाहेर भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते आणि मग माझा कोणीही अपमान केला नसता.