Song of Solomon 8:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वाळवंटातून, प्रियकराच्या अंगावर रेलत येणारी ही स्त्री कोण आहे? मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, जिथे तुझ्या आईने तुला प्रसवले, जिथे तुझा जन्म झाला तेथे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण? सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले; तेथे तुझी माता तुला प्रसवली; तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही कोण आहे जी वाळवंटातून आपल्या प्रियकरावर टेकून येत आहे? जिथे तुझ्या आईने गर्भधारण केले ज्या सफरचंदाच्या झाडाखाली; तिथे तुझ्या मातेला प्रसूती वेदना होऊन तिने तुला जन्म दिला, त्या ठिकाणी मी तुला उत्तेजित केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.