Song of Solomon 8:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रेमाला पूर नष्ट करु शकत नाही, नद्या प्रेमाला बुडवू शकत नाहीत. जर एखाद्याने आपल्या जवळचे सर्वकाही प्रेमासाठी उधळून दिले तर त्याला बोल लावला जाईल. त्याचा तिरस्कार होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही; महापुरांनाही ते बुडवून टाकता येणार नाही; मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रेमाचा अग्नी विपुल जलाशयांनी विझत नाही; नद्यांमध्ये महापूर आला तरी ती बुडत नाही. एखाद्याने आपल्या घरातील संपूर्ण संपत्ती देऊ केली तरी प्रेमापुढे ती अगदी तुच्छ होय.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही. महापुरांनी तिला बुडवून टाकिता येणार नाही. जरी मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी, ती त्यापुढे अगदी तुच्छ होय.