Titus 1:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देवाने आपल्या योग्य वेळी त्या जीवनाविषयीचा संदेश जगाला प्रकट केला. देवाने ते काम माझ्यावर सोपविले. त्या गोष्टीविषयी मी संदेश दिला कारण आमच्या तारणाऱ्या देवाने मला तसे करण्याची आज्ञा केली होती.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आणि उचित समयी त्याच्या संदेशात ते त्याने प्रकट केले. हा संदेश माझ्याकडे सोपविण्यात आला होता व मी आपल्या तारणाऱ्या देवाच्या आदेशानुसार तो जाहीर करीत आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या जीवनाची आशा बाळगणार्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल ह्याच्याकडून:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि आता त्यांच्या नियोजित वेळेनुसार प्रचाराद्वारे ते प्रकाशात आणले, जे आपल्या तारणार्या परमेश्वराच्या आज्ञेने मला सोपविण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले.